ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसांस्कृतिक

वरद हॉस्पिटल आणि आय सी यु कडुन इफ्तार पार्टीचे नियोजन !

सर्व मान्यवर डॉक्टरांचे जांभळी गावात सत्कार !

दावत-ए-इफ्तार मध्ये बंधुभावाचे दर्शन जांभळी ता 13 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त जांभळी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दावत-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले.शुक्रवार रोजी सायंकाळी जांभळी जामा मज्जिद येथे कार्यक्रमास हिंदू मुस्लिम समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन बंधुभावाचे दर्शन घडवले. रमजान महिन्यात रोजा सोडण्याच्या वेळी सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि सलोखा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांनी एकत्रितपणे इफ्तार करत परस्परांना शुभेच्छा दिल्या.अशा उपक्रमामुळे समाजात ऐक्य,बंधुता आणि सौहार्दाचे वातावरण अधिक दृढ होत असल्याची भावांना आयोजकांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे आयोजन वरद हाॅस्पिटल ॲण्ड आय.सी.यु बिडकिन संचालक डॉ सुरेश जंगले सर, डॉ.जागृती जंगले यांच्या पुढाकारातून करण्यात आले.यावेळी उपस्थित डॉ.शाम हिवरकर, डॉ.मोहन कोल्हे, डॉ. असलम पटेल, डॉ. युसूफ शेख, गरड,शाकेर शेख,सुखदेव सोनवने, ज्ञानेश्वर भवर,शुभम फलके,कृष्णा तांबे,अक्षय महाजन, नवनाथ गरड, निलेश राजपुरे यांच्यासह गावातील मंडळी व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.