अमरण उपोषण शेख शामद गुलाब (सरपंच) महांडुळा ता. गेवराई जि. बीड.
ठिकाण : पंचायत समिती कार्यालय, गेवराई ता. गेवराई जि. बीड.

महांडुळा येथील सार्वजनिक विहीरीवरील अतिक्रमण काढणे. महांडुळा येथील सार्वजनिक चार विहीरी शासनाने खर्च करून गावासाठी वर्ष २००८ ते २०१८-१९ च्या कालावधीमध्ये पुर्ण झालेल्या आहेत. परंतु तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत ला नोंद न घेतल्या कारणाने संबंधीत शेतकऱ्यांसोबत राजकीय संगनमत करून त्यांना अतिक्रमण करण्यासाठी साथ देण्यात येत आहे. तसेच शासनाने या चार विहीरीवर १.५ कोटी रूपये खर्च केलेला आहे.तरी देखील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी आज विहीर स्वतःच्या ७/१२ वर नांव नोंदणीचे प्रयत्न चालु आहे.जलजीवन मिशन अंतर्गत २०२२ ला तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनास गावासाठी योजना मागितल्या असता शासनानी ती योजना गावाला ती योजना मंजुर करून दिलेली आहे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी पुर्वीच्याच दोन विहीरी समाविष्ट केलेल्या आहे. विहीर १ भारत निर्माण योजनेतुन झालेली पुर्वीची विहीर तसेच एम.आर.ई.जी.एस. मधील पुर्वीच्या विहीरी ट्रेंडर मध्ये समाविष्ट करून घेतल्या व त्या काळात ४८ लक्ष रूपयाचे जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेली आहे. त्याचे काम देखील शेतकरी कामात अडथळा निर्माण करत जर काम केले तर आम्ही आत्मदहन करून तरी संबंधीत गुत्तेदाराने संबंधीत काम बंद ठेवलेले आहे. संबंधीत गुत्तेदाराने गावात पाणी पुरवठा करण्यासाठी गावात टाकी बांधलेली आहे. पण त्या टाकीत पाणी कुठून सोडणार गावासाठी पिण्याच्या पाण्याची या शेतकऱ्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. तरी पण शासनाने याची दखल घेवून ग्रामपंचायतला सहकार्य करावे. तात्काळ विहीरीची नोंद ग्रामपंचायत च्या मालमत्ता रजिस्टर नोंद तसेच संबंधीत क्षेत्रात ग्रामपंचायतच्या नावे ७/१२ नोंद घेण्यात यावी. असे न झाल्यास उपोषण सोडण्यात येणार नाही.