
पाटोदा तालुक्यातील मुस्लिम तरुणांचा स्तुत्य उपक्रम.अलकरीम फौंडेशनच्या माध्यमातून पंजाब येथे मदत.
पंजाब राज्यात पावसाचा कहर झाला असुन संपूर्ण पंजाब तबाह झाल्याने येथे मदतीचा ओघ सुरू आहे यातच न्यू अलकरीम फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पंजाब येथे मदत करण्यात यात पाटोदा येथिल मुस्लिम तरुणांनी सहभाग नोंदवला.
अलकरीम फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिवनावश्यक वस्तुचे किट पंजाब राज्यातील गुरुदासपुर भागात ग्रामीण भागातील नागरिकांना ही मदत घरपोच करण्यात आली.यासाठी अलकरीम फौंडेशन चे पाटोदा येथिल तरुण अबुरेहान शेख,सरफरोज सय्यद
सलमान पटेल,साजिद सय्यद
इस्माइल सय्यद सह स्थानिक तरुणांनी सहभाग घेतला.या मुस्लिम तरुणांनी अगदी दलदलीच्या भागात ग्रामीण भागातील नागरिकांना ही मदत घरपोच केल्याने पाटोदा तालुक्यात कौतुक होत आहे.

