रमज़ान की बरकत ! जरूरतमंदों की मदद !
केजीएन ग्रुप जहीर कादरी याच्या वतीने गरजुना पाच हजार कीटचे वाटप

एएसपी पांडकर, पो.नि. बल्लाळ, मुदीराज, डॉ. थोरात यांची उपस्थिती.
बीड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य केजीएन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जहीर अली कादरी यांनी दरवषी प्रमाणे या ही वर्षी देखील रमजान ईद निमित गोरगरीब आणि गरजू कुटूंबियांना पाच हजारापेक्षा अधिक रेशन कीट, ईद साठी आवश्यक साहित्याच्या कीटचे वाटप केले. अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.उस्मान शेख, शहर ठाण्याचे. पो.नि. शितलकुमार बढ़ाळ, पेठबीड ठाण्याचे पो.नि. अशोक मुदीराज, श्रीडचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते या कीटचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे केवळ मुस्लीम समाजातीलच गोरगरीब गरजूंनाच नव्हे तर इतर समाजातील गरजूंना देखील रेशन कीट वाटप करून सर्वांचीच ईद गोड करण्यात आली. अब की ईद-सब की ईद याप्रमाणे जहीर कादरी यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.