माजी राज्यमंत्री बदामरावजी पंडित यांच्या कडुन रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
गेवराई प्रीतनिधी

माजी राज्यमंत्री बदामरावजी आबा पंडित यांच्या वतीने शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीस मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवून मोठा प्रतिसाद दिला. यावेळी युवा . यावेळी युवा नेते युद्धजीत दादा पंडित व यशराज पंडित यांनी आबांसोबत आलेल्या मुस्लिम बांधवांचे स्वागत केले. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल सभागृहात लोकनेते माजी राज्यमंत्री बदामरावजी आबा पंडित यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र रमजान महिण्यानिमित्त मुस्लिम बांधव दिवसभर उपवास पाळतात. सायंकाळी उपवास सोडण्यात येतो. गेवराई तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीस गेवराई शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी शहरातील मुस्लिम बांधवासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते